Thursday, 17 January 2019

पनवेल येथे आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनअलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.17:- प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर, रायगड जिल्हा परिषद शिक्षण  विभाग व सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी पनवेल जि.रायगड व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.18 ते रविवार दि.20 दरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यंदाचे हे आठवे विज्ञान प्रदर्शन आहे.
        या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी, शेडयुंग, पनवेल येथे होणार आहे. या उद्घाटनास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण,  विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, माजी पालकमंत्री सुनिल तटकरे यांची उपस्थित राहणार आहे.  तरअध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,   खा.श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत. 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे आ.निरंजन डावखरे तसेच विधानसभा सदस्य सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर,आ.सुरेश लाड,कर्जत,आ.श्री.सुभाष पाटील, अलिबाग, आ.धैर्यशील पाटील पेण, आ.भरत गोगावले महाड, आ.अवधूत तटकरे,आ.मनोहर भोईर, उरण,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग राजेंद्र अहिरे, सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.केश बडाया, सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिषेक जैन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचा  समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 20 रोजी दुपारी दोन वा. जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदिती तटकरे व उपाध्यक्ष ॲङ आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  या प्रदर्शनास उपस्थितीचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती नरेश तातूराम पाटील यांनी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) भाऊसाहेब थोरात, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) शैलजा दराडे यांनी केले आहे.
00000

‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत वडखळ येथे लाभ वाटप : योजनांचा लाभ पोहोचल्याने गावांचा विकास-पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाणअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- ‘आमचा गाव आमचा विकास’, च्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या  विविध योजनांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका क्षेत्रासाठी लाभार्थ्यांना लाभ वाटप झाल्याने गावांचा विकास होत आहे, प्रतिपादन  राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी वडखळ ता. पेण येथे (दि.16 रोजी) केले.  वडखळ ग्रामपंचातीने राबविलेला हा विकासात्मक कार्यक्रम स्तुत्य असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
            वडखळ ग्रामपंचायतींमार्फत आयोजित या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचेआमदार प्रशांत ठाकूर, पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रितम पाटील, पेण तहसिलदार अजय पाटणे, वडखळ सरपंच राजेश मोकल, उपसरपंच रविंद्र म्हात्रे, पेण गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, गोरगरीब जनतेचा विकास व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजना वडखळ ग्रामपंचातीमार्फत आरोग्य, शिक्षण व उपजिविकांच्या लाभासाठी वडखळ परिसरातील जनतेपर्यंत पोहचत आहेत.  खारेपाट परिसरातील पाण्याची समस्या दूर व्हावी याकरिता शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  तसेच या परिसरातील उद्योगांकडून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील.  महिलांसाठी मोफत गॅस, बेटी बचाओ बेटी पढाओ, गरोदर मातांना पोषण आहार, घरकुल योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत  असून त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राथमिक शाळांना संगणक, दप्तर वाटप, अंगणवाडीतील मुलांना सकस आहार, मुलींच्या जन्माचे स्वागत, अपंग व्यक्तींसाठी अनुदान वाटप, आदिवासी वाडीतील शाळांना साऊंड सिस्टीमचे वाटप यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास वडखळ परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Wednesday, 16 January 2019

मतदार जागृती बाबत नोडल अधिकाऱ्यांची कार्यशाळाअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदार केंद्रस्तरावर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत नोडल अधिकारी यांची मतदार जनजागृतीत भूमिका, मतदार जनजागृती कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयात भावी मतदार व नवीन मतदार यांच्यासाठी निवडणूक साक्षरता क्लब स्थापना करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरावर ‘चुनाव पाठशाळा’ स्थापन केल्या असून त्या मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, संस्था इ. मध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्यात येत आहेत. या मतदार जागृतीमंच मध्ये त्या-त्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन झाले आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 6 लाख 24 हजार बालकांना लसीकरणअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 16- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि.15 जानेवारी) अखेर जिल्ह्यातील 6 लाख 24 हजार 889  बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.15) दिवसाअखेर जिल्ह्यातील 34 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 17 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 274 विद्यार्थ्यांना तर 17 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 3925 विद्यार्थ्यांना अशा एकूण 4 हजार 199 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 24  हजार 410 मुले  व 3 लाख 479 मुली असे एकूण 6 लाख 24 हजार 889 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 5884 शाळांपर्यंत पोहोचली आहे.
00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौराअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गीते हे  दि.18 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शुक्रवार दि.18 रोजी दुपारी चार वा. माणगाव येथे आगमन.  सायंकाळी सहा वा. माणगाव येथून चिपळूण, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
रविवार दि. 20 रोजी रात्री एम.आय.डी.सी.महाड येथे आगमन व मुक्काम.  सोमवार दि. 21 रोजी सकाळी साडेनऊ वा. महाड एम.आय.डी.सी. येथून बोराज फाट ता.पोलादपूरकडे प्रयाण.  दुपारी दोन वा. बोराज फाट ता.पोलादपूर येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय कार्यशाळा ; लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ जीवनात बदल घडवतो- यावलकरअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- स्वतःचे घर हे जीवनात स्थैर्य निर्माण करते.केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात गटविकास अधिकारी व यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असते. या योजनांचा लाभ पोहोचवून तुम्ही लाभार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र सकारात्मक बदल घडवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभय यावलकर यांनी आज येथे केले.  
 येथील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत आवास योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध तांत्रिक, लेखाविषयक अडचणींबाबत कार्यान्वयन यंत्रणा असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी कोकण विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री.यावलकर बोलत होते.
आवास सॉप्ट संदर्भातील तांत्रिक अडचणी, बांधकाम आणि लेखा विषयक बाबी संदर्भात पर्णकुटी,ओमकार फ्रेंड सर्कल पडवळवाडी वरसोली अलिबाग येथे ही  एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी कोकण विभाग उपआयुक्त भरत शेडगे, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद कवळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड प्रकाश देवऋषी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी पनवेलकर, सहा.प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड रामदास बघे आदि उपस्थित होते.
            यावेळ मार्गदर्शन करताना श्री.यावलकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम प्रतीचा निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक,बांधकाम व लेखा विषयक बाबींच्या अडीअडचणींचे निराकरण व्हावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ग्रामीण भागातील नागरिकांना निवारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक अधिकारी वर्गाने आपल्याला दिलेले उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.   
            या कार्यशाळेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रकल्प संचालक,उपअभियंता, सहा.प्रकल्प अधिकारी, लेखा अधिकारी, प्रोग्रॅमर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, गटविकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Tuesday, 15 January 2019

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौराअलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  बुधवार दि.16 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार दि.16 रोजी दुपारी पावणे चार वा. डोलवी येथे आगमन व श्री दत्तकृपा वाहन वाहतूक चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.  स्थळ : जे.एस.डब्ल्यू गोवा गेट डोलवी.  दु.चार वा.वडखळ ता.पेण ग्रुप ग्रामपंचायत येथे आगमन व ‘आमचा गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका इत्यादी घटकांबाबतचे साहित्य वाटप कार्यक्रम.  स्थळ : ग्रुप ग्रामपंचायत वडखळ.  सायं. पाच वा. वडखळ येथून कर्जतकडे प्रयाण.  सायं.साडे सहा वा. कर्जत नगर परिषद निवडणूकी संदर्भातील भाजपा कार्यकर्ता आढावा बैठक व मार्गदर्शन.  रात्री साडेआठ वा. कर्जत येथून  पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000