भातपिकासाठी किड नियंत्रण सल्ला

           
अलिबाग दि.30 (जिमाका)-  भात पिकावरील कीड सर्वेक्षणानंतर  कृषि विभागाच्या वतीने भात पिकासाठी खालीलप्रमाणे किड नियंत्रण सल्ला देण्यात आला आहे.
पिवळ्या खोडकिड्यासाठीः- लावणी नंतर शेतात 5 टक्के कीडग्रस्त फुटवे आढळल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळल्यास, खालीलप्रमाणे उपाययोजना करावी. वेळोवेळी कीडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत.
उपाय योजना :- शेतात कडूलिंबयुक्त कीटकनाशके वापरावीत. २५ टक्के प्रवाही क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून  फवारावे किंवा फिप्रोनील 0.3 जी 10 किलो प्रति एकर प्रमाणे शेतात फोकून टाकावे.                      
निळे भुंगेरे किडीसाठी-  ही किड पानाच्या वरच्या भागातील हरितद्रव्य खातात, पानावर पांढऱ्या समांतर रेषा उमटतात व त्याचे पांढरे चट्टे तयार होतात कालांतराने हे चट्टे तपकिरी होतात व पाने करपलेली दिसतात. नत्र खताचा अवाजवी वापराने प्रादुर्भाव वाढतो, 1 ते 2 प्रती चुड प्रादुर्भाव आढळल्यास  खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
उपाययोजनाः- क्विनॉलफॉस  25 टक्के प्रवाही 20 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करावी.                      
करपाः- रोपावस्था ते पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत  पानांवर सुरुवातीला करड्या रंगाचे ठिपके दिसतात नंतर ते वाढत जाऊन दोन्ही बाजूला निमुळते व मध्ये उग्र होतात.
उपाययोजनाः- नत्र खताचा योग्य वापर करावा, अतिरिक्त वापर टाळावा. नियंत्रणासाठी ट्रायक्लाझोल 75 टक्के 6 ग्रॅम किंवा कार्बनडेन्झीम 50 टक्के 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावी, असा सल्ला खोपोली येथील उपविभागीय कृषि अधिकारी  यांनी दिला आहे.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक