कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले
कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.7 (जिमाका) कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. कोंकण विभागातील पाच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माणगाव प्रांत.विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते. कोंकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्...