पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना चला विकसित करु या आपले पशुधन...!
विशेष लेख क्र.5 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2021 सन 2020-21 या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राज्यात राबविण्यात येणार आहेत. ही योजना रायगड जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. चला तर मग या योजनांचा लाभ घेऊन आपले पशुधन विकसित करु या...! 6/4/2 दुधाळ संकरीत गायी/म्हशींच्या गटाचा पुरवठा करणेः - या योजनेमध्ये पशुपालकास 6/4/2 दुधाळ संकरित गायी, म्हशी खरेदी करता येतात. 6 जनावरांच्या गट खरेदीसाठी प्रकल्प अहवालानुसार एकूण रू.3 लाख 35 हजार 184/-, 4 जनावरांच्या गटासाठी रू.1...