मतदाराचा आधार क्रमांक मतदार यादीतील तपशिलाशी ऐच्छिक जोडणी कार्यक्रम जाहीर दि.11 सप्टेंबर ला पहिले विशेष शिबिर
अलिबाग,दि.10 (जिमाका):- निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत घरोघरी भेट देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती करण्यात आली असून दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने मतदार यादी संदर्भातील नमुना अर्ज 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 B नुसार फॉर्म नं. 6 ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट, 2022 पासून लागू झालेली आहे. दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेल्या म...