जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी होणार दिव्यांगांची तपासणी
रायगड(जिमाका),दि.20:- नैसर्गिक अथवा अपघाताने आलेल्या दिव्यंगत्वाची तपासणी करून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या बांधवाना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. ज्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळतो. या प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सध्या अस्थिव्यंग व भिषक याविभागाकरिता बुधवार व नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या विभागांकरिता गुरुवार रोजी कामकाज सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने दिली आहे. परंतु अनेक रुग्णांना एकाधिक अपंगत्व असल्याने बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशीच्या समितीतील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेण्याकरिता उपस्थित राहावे लागत होते. तसेच ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्याने अनावधानाने मिळालेल्या माहितीनुसार रुग्ण व त्याचे नातेवाईक चुकीच्या दिवशी प्रमाणपत्राकरिता रुग्णांना घेऊन आल्यास, तपासणी समितीचे बोर्ड त्या दिवशी अद्ययावत नसल्याने तपासणी करू...