रायगड विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

रायगड-अलिबाग दि.27:- रायगड विधानसभा निवडणूक संदर्भात खर्च निरीक्षक म्हणून श्री.विनोद कुमार, श्री.के.सुनिल नायर व श्री.श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली आहे. आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी या खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. १८८ पनवेल, १८९ कर्जत या विधानसभा मतदार संघासाठी विनोद कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२०५९६ असा आहे. १९० उरण, १९१ पेण या विधानसभा मतदार संघासाठी के.सुनिल नायर यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रणणध्वनी 9158719876 असा आहे. १९२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन, १९४ महाड या मतदार संघासाठी श्रीबास नाथ यांची नियुक्ती झाली असून त्यांचा संपर्क भ्रमणध्वनी ९१५८७२४६३४ असा आहे. ०००००