मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्याची 100 टक्के उद्दिष्ट पूर्ती
रायगड(जिमाका)दि.21:- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरीता असलेल्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र,रायगड करीता प्राप्त 600 प्रकरण उद्दीष्टांची जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देशन व मार्गदर्शनाने 100 टक्के पूर्तता केली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., इ. अलिबाग या सार्वजनिक व सरकारी बँकानी त्यांना दिलेले उद्दीष्ट विहित वेळेत पूर्ण केल्याने चालू आर्थिक वर्षात योजने ं तर्गत जिल्हा उद्योग केंद्राची उद्दीष्टपूर्ती पूर्ण झालेली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून भविष्यात देखील रायगड जिल्हा आघाडीवर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन केले आहॆ. सुशिक्षित बेरोजगारांनी स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरीता राज्य शासनाच...