रायगड जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध --मंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न
.jpeg)
रायगड (जिमाका)दि.5:- रायगड जिल्ह्यातील य नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सात मजली 300 खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकत्सक रायगड डॉ.निशिकांत पाटील, डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री...