कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ
रायगड(जिमाका),दि.18:- :आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात आज विकासाची नवी पहाट उगवली आहे. या आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ (दि.17 सप्टेंबर रोजी) खालापूर तालुक्यातील कलोते-विनेगाव कातळाची वाडी तसेच माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी माणगाव संदीपान सानप, सानप, तहसीलदार श्री.काळे, गटविकास अधिकारी श्रीम. शुभदा पाटील, खालापुर तालुक्याचे तहसीलदार. अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ...