चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी झाली राज्यस्तरीय रंगीत तालीम जिल्ह्यातील वरसोली, केंवाग तांडा, नाव्हा-शेवा,मुरुड,श्रीवर्धन,दिवेआगर,दासगाव गावांचा समावेश
रायगड (जिमाका) दि.9:- : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली (आरसीएफ कॉलनी कुरुळ), उरण तालुका केगाव तांडा, पनवेल तालुका नाव्हा-शेवा, ता.मुरुड, ता.श्रीवर्धन, दिवेआगर, ता.श्रीवर्धन, दासगाव, ता.महाड या 7 गावांमध्ये व आर.सी.एफ.थळ, ता.अलिबाग, ओ.एन.जी.सी.कंपनी ता.उरण, पाताळगंगा एमआयडीसी पार्क/रसायनी, उरण गॅस पॉवर प्लांट ता. उरण या 4 कंपन्यामध्ये, तसेच धरमतर, रेवदंडा, ता.अलिबाग, उलवे ता.पनवेल, दिघी ता.श्रीवर्धन व इतर मासेमारी जेट्टीच्या ठिकाणी वादळवामध्ये अडकलेल्या मच्छिमारांच्या शोध व बचावाचे कार्य करणे अनुषंगाने आज चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्नीशमन, इंडस्ट्रीयल सेफ्टी ॲण्ड हेल्थ, मत्स्यविभाग, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, आपदा मित्र, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदी प्रमुख विभागांनी आपली सज्जता यावेळी दाखविली. चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख...