कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर जिल्ह्यातील वरसोली बीच व मुळगांव जेट्टी येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण
रायगड,(जिमाका)दि.08:- कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. रायगडसह कोकणातील सात जिल्ह्यात सात ड्रोन कंट्रोल रुम्सच्या माध्यमातून नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे. अशा पध्दतीची आधुनिक यंत्रणा राज्यात प्रथमच अमलात येत असून जिल्ह्यातील वरसोली बीच येथील क्रिकेट मैदान, ता.अलिबाग व मुळगांव जेट्टी, मुळगांव, ता.श्रीवर्धन येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांनी दिली. आहे. महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 (सुधारीत 2021) हा कायदा अंमलात आला आहे. या सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होत असते. गस्ती नौके सोबतच राज्...