निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी दि.20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
अलिबाग,दि.9(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरून निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निर्लेखित झालेले हत्यारे, उपकरणे व लाकडी फर्निचर इत्यादी साहित्याचा समावेश आहे. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांकडून दि.06 फेब्रुवारी 2023 पर्यंत सीलबंद निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु निर्लेखित साहित्याच्या निविदा प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे या निविदा प्रक्रियेस दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधित विभागामध्ये सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहावयास मिळतील. याच कालावधीदरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/- (अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल, नमुन्यातील ही पूर्ण माहिती अचूकपणे भरलेली निविदा अर्जासोबत रु.5 हजार अनामत रक्कम जमा करणे गर...