शासनमान्य राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा खोपोली येथे संपन्न
अलिबाग,दि.17(जिमाका):- महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेतील अत्यंत मानाची आणि महत्त्वाची अशी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022-23 ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी, समर्थ मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या आठ विभागतील महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे दिमाखदार प्रदर्शन केले. . या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलम्पियन मारुती आडकर, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, टाटा स्टील कंपनीचे,कपिल मोदी,शशी भूषण, भावेश रावल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे...