जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन
रायगड,दि.9(जिमाका):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात "बिपर जॉय" नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पर्जन्यमान विषयक व वाऱ्याच्या वेगाविषयक खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती पुढीलप्रमाणे : - दि.9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी....