राज्यात कुष्ठरोग आता "नोटिफायबल डिसीज" सर्व नव्या रुग्णांची नोंदणी शासनाला कळविणे बंधनकारक
रायगड-अलिबाग (जिमाका) दि.17 :- राज्य सरकारने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे परिणामी राज्यातील सर्व डॉक्टरांना कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची नोंद दोन आठवड्याच्या आत आरोग्य विभागाकडे करणे बंदरकारक असणार आहे. राज्यात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव रोखणे आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावे त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टरियम लेप्रे या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. त्वचा परिघीय नसा, डोळे आणि अन्य अवयवावर त्याचा परिणाम होतो या आजाराबद्दल अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव दिसून येतो. लवकर निधान न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख उपाय असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. राज्य शासनाने 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरोगाविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे. कुष्ठरोग नियंत्रणास...