रायगड जिल्हा प्रशासनाची “परिवर्तन” कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध
अलिबाग, दि.28 (जिमाका):- रायगड जिल्हा प्रशासनाने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 2) ही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कार्यपुस्तिका फ्लिपिंग ई-बुकच्या माध्यमातून सर्व नागरिकांना https://raigad.gov.in/en/ parivartanebook/ या लिंकवर वाचण्याकरिता विनामूल्य उपलब्ध आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2022 रोजी संपन्न झाले. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीतील राबविलेल्या उपक्रमांची माहिती देणारी परिवर्तन (भाग 1) ही कार्यपुस्तिकादेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर 24 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी पदी रुजू झाल्यानंतर प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहन्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात “ परिवर्तन ” घडवून आणण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कामकाजास उत्साहान...