बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारी (दि.२०) दिले. जिल्ह्यातील आय.एम.ए., आर.एम.ए., आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमिओपथीक वैद्यकीय संघटनाकडून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई,अति.शल्यचिकीत्सकडॉ.फुटाणे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, नगरपालिकास्तरावर मुख्याधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त ...