राज्यमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- ना.रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे 17 व 18 जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दि. 17 रोजी दुपारी एक वाजता पाली-सुधागड येथे आगमन (श्री क्षेत्र गणपती बल्लाळेश्वर दर्शन). दुपारी सव्वा वाजता शासकीय विश्रामगृह पाली येथे आगमन व राखीव. दुपारी दोन वाजता प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ :- शासकीय विश्रामगृह पाली-सुधागड). दुपारी अडीच वाजता पाली-सुधागड येथून माणगांवकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह माणगांव येथे आगमन. दुपारी सव्वा तीन वाजता माणगांव तालुक्यातील विविध विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत आढावा बैठक. (स्थळ :- शासकीय विश्रामगृह माणगांव). दुपारी चार वाजता माणगांव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी साडे चार वाजता माणगांव येथून ता.म्हसळाकडे प्रयाण. सायं. पाच वाजता शासकीय विश्रामगृह म्हसळा येथे आगमन. सायं. सव्वा पाच वाजता म्हसळा तालुक्यातील विविध विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत आढावा बैठक. (स्थळ :- शासकीय विश्रामगृह म्हसळा). सांय. पावणे पाच वाजता प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. सांय. साडे सहा वाजता तालुका श्रीवर्धनकडे प्रयाण. रात्री साडे सात वाजता शासकीय विश्रामगृह श्रीवर्धन येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार दि. 18 रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी साडे दहा वाजता श्रीवर्धन तालुक्यातील विविध विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत आढावा बैठक. (स्थळ :- शासकीय विश्रामगृह श्रीवर्धन). सकाळी सव्वा अकरा वाजता श्रीवर्धन येथून दिवेआगारकडे प्रयाण. सकाळी पावणे बारा वाजता दिवेआगार येथे आगमन व विकास कामांचे भूमीपुजन व कार्यकर्ता सभा. दुपारी दीड वाजता दिवेआगार येथून दिघीकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता दिघी येथे आगमन व राखीव. दुपारी अडीच वाजता दिघी येथून बोर्लीपंचतनकडे प्रयाण. दुपारी पावणे तीन वाजता बोर्लीपंचतन येथे आगमन व रस्त्यांचे भूमीपुजन तसेच श्रीक्षेत्र चिंचबादेवी मातेचे दर्शन. दुपारी तीन वाजता कुडगाव ग्रामस्थांची भेट. दुपारी सव्वा तीन वाजता दिघी येथे आगमन व विकासकामाचे भूमीपुजन तसेच कार्यकर्ता सभा. दुपारी चार वाजता दिघी पोर्ट येथे आगमन व कोळी बांधव तसेच ग्रामस्थांच्या समस्याबाबत बैठक. दुपारी साडे चार वाजता दिघी येथून खारघर पनवेलकडे प्रयाण. रात्री साडे आठ वाजता सरस्वती इंजिनिअरींग कॉलेज खारघर येथे आगमन व आखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यक्रमास उपस्थिती. रात्री साडे नऊ वाजता खारघर येथून डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.

00000 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत