पोषण महिना अभियान पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रकाशन
अलिबाग दि.31 ऑगस्ट :- जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत 1 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत पोषण महिना अभियान -2019 राबविण्यात येणार आहे. यासाठी पोषण महिना पुस्तिका तयार करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांचे कक्षात या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी जि.प. श्री. मंडलिक, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.उमाताई मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोषण महिना अभियान-2019 कार्यक्रम दि.1 सप्टेंबर जिल्हास्तर,तालुकास्तर आणि अंगणवाडी स्तरावर पोषण महिना उद्घाटन समारंभ व त्याचे सर्व तालुक्यांनी सदरचा कार्यक्रम पाहणे,अंगणवाडी सेविका,अे.एन.एम.,आशा वर्कर यांनी संघटनात्मक सहभागी होणे व उद्घाटन समारंभाचे आयोजन करणे. दि.2 सप्टेंबर गणेशोत्सव देखाव्यांमध्ये अभियानाबाबत बॅनर्स,पोस्टर्स लावणे. दि.3 सप्टे...