युथ हॉस्टेल आयोजित 26 वी राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहीम रा.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांचे सहभागाकरीता आवाहन रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी सहभागी होणार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या आणि हिन्दवी स्वराज्याच्या राजधानीच्या दूर्गराज रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालून नव्या पिढीमध्ये स्फूर्ती आणि चैतन्याचे स्फूलींग चेतविण्याकरीता युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखा, महाड युनिट आणि युथ क्लब महाड यांच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा परिषद पुरस्कृत 26 व्या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन रविवार दि. 24 डिसेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेच्या सहभाग आवाहनपत्नचे प्रकाशन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्यशाखेचे कार्याध्यक्ष व गिर्यारोहक रमेश केणी यांच्या हस्ते गुरूवारी रायगड जिल्हा परिषदेत करण्यात आले. पंतप्रधान मोदि यांच्या कडून रायगडची संवर्धन व विकासाकरिता सर्वप्रथम निवड देशातील ऐतिहासीक गडकिल्ले ही तरण पिढीची स्फूर्तीस्थाने कर...