वादळातील नुकसानीचे पंचानामे तातडीने करा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे पेण येथील बैठकीत निर्देश

अलिबाग जि.रायगड,दि.6(जिमाका) - जिल्ह्यात नुकतेच वादळामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसआनग्रस्तशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आज पेण येथे राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांनी दिले. ना. चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना पेण येथे नगरपरिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार अजय पाटणे, उपनगराध्यक्ष जयवंत गुरव, पेण न.पा. मुख्याधिकारी अर्चना दवे, नगरसेवक शोमेर पेणकर आदी तसेच तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वादळी पावसात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने महसूल, कृषि, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग आदी विभागांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेला सोयी सुविधा वेळत पुरविण्यात याव्या, असेही त्यांनी यावेळी उपस्थित ...