रायगड जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाची सुवर्णसंधी
रायगड(जिमाका) दि.02:- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 चे ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी पोर्टल दि. 16 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे. इयत्ता 6 वी साठी पात्रता- विद्यार्थी हा पाचवीत शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये शासकीय तसेच शासनमान्य प्राप्त शाळेत रायगड जिल्ह्यात शिकत असणे आवश्यक आहे, विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील रहिवासी असावा, तसेच आधार कार्डवर रायगड जिल्ह्याचा रहिवासी पत्ता असणे आवश्यक आहे, जन्म तारीख 01 मे 2013 ते 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) मधील असावी. यावर्षी आधारकार्ड आवश्यक असून त्यासाठी लिंक असणाऱ्या मोबाईल वर ओटीपी येणार असून पुढील अर्ज अपलोड करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. (यासाठी आधार कार्ड अपडेट करावे. आधार कार्ड नसल्यास शासकीय नियमानुसार पालकाचे याच जिल्ह्यातील पुरावा म्हणून रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करावे. अर्ज अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, विहित नमुन्यातील मुख्याध्यापकाचे साक्षांकित प्रमाणपत्र, स्कॅन केलेली विद्यार्थी व पालकाची सही इत्यादी बाबी तयार ठेवाव्या . अंतिम सबमिशन पुर्वी अर्जातील तपश...