केळवणे येथे शिधापत्रिका वाटपः विकास योजनांचा लाभ घ्या -ना.रविंद्र चव्हाण

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14 - केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज केळवणे ता. पनवेल येथे केले. आज केळवणे येथे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत खारफुटी बाधित शेतकऱ्यांना शिधापत्रिका वितरण ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आ.प्रशांत ठाकूर, केळवणे सरपंच अश्विनी घरत, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जिल्हा पुरवठा अधिकारी दुपारे, तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी तेटगुरे, पुरवठा अधिकारी अस्मिता जाधव तसेच अरुणशेठ भगत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात ना. चव्हाण म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अभिप्रेत असलेल्या डिजिटल क्रांतीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाटचाल करीत आहे.कल्याण...