उरणमध्ये सीएनजी पंप स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14-  महानगर गॅस आणि इंडियन ऑइल यांच्या सहकार्याने फुंडे ता. उरण येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सुरू करण्यात आलेल्या सीएनजी पंप स्टेशनचे लोकार्पण  आज राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.
उरण येथे आयोजित या कार्यक्रमास ना. चव्हाण यांचे समवेत आ.प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे ट्रस्टी महेश बालदी, सरपंच जयवंती म्हात्रे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, तहसिलदार  कल्पना गोडे, समीर मढवी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, चंद्रकांत घरत, रविशेठ भोईर, कौशिक शहा, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक संजीब दत्ता, इंडियन ऑईलचे महाव्यवस्थापक पार्थ बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणाऱ्या उरण परिसरात सीएनजी पंप स्टेशनची सुविधा आवश्यक होती ती आज पासून उपलब्ध होत आहे. तर या इंधनाच्या वापराने प्रदुषणालाही आळा बसेल, असे मनोगत ना. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
            यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  ते म्हणाले की, हे पंप स्टेशन उरणमधील वाढत्या प्रदूषणावर मात करण्याचे काम करेल. तालुक्यात इतर ठिकाणीही अशा प्रकारचे सीएनजी पंप उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास महेश कडू, दीपक भोईर, नीळकंठ घरत, जितेंद्र घरत, प्रदीप नाखवा, शेखर तांडेल, मेघनाथ म्हात्रे, दिनेश तांडेल, प्रकाश ठाकूर, योगेश पाटील, हरेश भोईर, सुनील पाटील, रिक्षा युनियन अध्यक्ष महेश पाटील
 आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज