रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी
अलिबाग,दि.15 (जिमाका):- अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच पुलाची पुर्नबांधणी व दुरुस्तीचे काम करण्याकरिता रेवदंडा-साळाव पुल दि.29 ऑगस्ट 2024 पुलावरून 12 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी अधिसूचनेच्या दिनांकापासून रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतूक दि.29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत बंद करुन अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-को लाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड- रोहा- तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रो हा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड- साळाव- तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड - नागोठणे- वडखळ-पोयनाड -अलिबाग अथवा मुरुड...