ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान गाव विकासासाठी वास्तवदर्शी आराखडा हवा- माजी मुख्यसचिव गायकवाड

अलिबाग,(जिमाका)दि.9- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत गावांचा विकास करतांना गाव निहाय विकास आरखडा तयार करण्यात येत आहे, तथापि हा आराखडा तयार करतांना त्यात गाव विकासाचे वास्तवदर्शी प्रतिबिंब असणारा आराखडा हवा, अशी अपेक्षा राज्याचे माजी मुख्य सचिव व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे ग्राम प्रवर्तकांशी बोलतांना व्यक्त केली. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीकोनातुन गावे सक्षम करण्यासाठी राज्यात राबविले जात आहे. त्या अंतर्गत राज्यातील एक हजार गावे स्वयंपुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यात रायगड जिल्ह्यातील 16 गावांचा समावेश आहे. आज या गावांतील ग्राम प्रवर्तक व जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांसह श्री. गायकवाड यांनी आढावा घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.डी. शिगेदार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक शालिक पवार, कौशल्य विकास अधिकारी...