मुरुड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांचे फलित
अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात मुरूड, आगरदांडा परिसरात कायमस्वरूपी मत्स्यजेट्टी उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा; तसेच सध्या उपलब्ध जेट्टींची पाहणी करून योग्य ठिकाणी मत्स्यव्यवसायासंबंधी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील आगरदांडा प्रवासी जेट्टीवर मासेविक्री करण्याबाबत आणि खोराबंदर येथे तात्पुरती जेट्टी बांधकामाबाबत श्री. भरणे यांच्याकडे पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी तसेच मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ...