अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

दिनांक :- 28 ऑक्टोबर 2016 वृत्त क्र. 696 अलिबाग जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा अलिबाग, दि.28:- आयुष कार्यक्रमांतर्गत आज अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांस, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.अजित गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ.ननावरे,, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आयुष अधिकारी,डॉ.चेतना पाटील तसेच आयुर्वेद व आहारतज्ञ डॉ. भक्ती पाटील आदी उपस्थित होते. या प्रसंगी मधुमेह जनजागृती अभियानासाठी आयुष विभाग रायगडद्वारे मुद्रीत केलेल्या माहिती पत्रकाचे अनावरण ...