प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2020 पर्यंत
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 :-प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020-21 पासून तीन वर्षांकरिता लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतक-यांना हवामानातील प्रतिकूलतेमुळे पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड,भूस्खलन, ढगफूटी, नैसर्गिक आग, वादळ, गारपीट, वीज कोसळणे यामुळे होणारे नुकसान, काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभ मिळणार आहे. येत्या खरीप हंगामात अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सहभागी शेतक-यांना या योजनेद्वारे आर्थिक आधार मिळणार आहे. कोकण विभागातील शेतक-यांना शासनाकडून नियुक्त विमा कंपनीमार्फत पिक विमा उतरविता येणार आहे. ही योजना खरीप हंगामामध्ये भात, नाचणी व उडीद या पिकांकरिता अधिसूचित क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. भात पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.45 हजार 500 प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.910/- प्रति हेक्टर, नाचणी पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.20 हजार प्रति हेक्टर व भरावयाचा विमा हप्ता रु.400/- प्रति हेक्टर, उडीद पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम रू.20...