भौगोलिक मानांकन मान्यताप्राप्त फलोत्पादन पिकांचे अधिकृत वापरकर्ता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत मोहीम
अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका):- केंद्र व राज्य शासनाने कृषी माल निर्यात धोरण लागू केले आहे. राज्यात जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात कक्षाची स्थापना दि.15 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आली आहे. भौगोलिक मानांकन मान्यताप्राप्त फलोत्पादन (फळे व भाजीपाला पिकांचे, कृषी उत्पादनांच्या नोंदणी, प्रचार प्रसिद्धी व मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अधिकृत वापरकर्ता वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यातील विविध भागांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे फळे व भाजीपाला उत्पादन घेतले जात असल्याने व त्या भागातील वैविध्यपूर्ण बाबींकरिता प्रसिध्द असल्याने संबंधित विभाग व जिल्हे आता फळपीकनिहाय देशात त्या नावाने ओळखले जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभागातील हापूस आंब्यास वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. फलोत्पादन विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध फळबाग लागवड योजनामुळे संपूर्ण राज्यात आणि कोकणात फळबागांखालील क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करून या पिकाच्या गुणवत्तेस हमीभाव मिळण्याचे दृष्टिकोनातून भौगोलिक चिन्हांकन नों...