महाडमधील तळीये दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख मंगेश कुडाळकर यांनी दिली सांत्वनपर भेट

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- महाड तालुक्यातील तळीये या  दरडग्रस्त भागाची विधानसभा सदस्य व महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख श्री.मंगेश कुडाळकर आणि विधानसभा सदस्य व समिती सदस्य अभिजित वंजारी यांनी आज पाहणी केली. तसेच त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

    इतर मागासवर्ग कल्याण समिती तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आली असून काल (दि.10 नोव्हेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महाडमधील तळीये या गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतची त्याचप्रमाणे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने केलेल्या मदतीबाबतची माहिती समिती प्रमुख तसेच इतर समिती सदस्यांना दिली होती.

       या पार्श्वभूमीवर तळीये गावाचे पुनर्वसन ज्या ठिकाणी करण्यात आले आहे त्या ठिकाणी जावून तेथील नागरिकांची समिती प्रमुख श्री.कुडाळकर व समिती सदस्य श्री.वंजारी यांनी आस्थेने विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने केलेल्या पुनर्वसन कामाबाबत समाधानही व्यक्त केले.

      यावेळी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार,महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, तळीयेचे माजी सरपंच श्री.तांदळेकर, ग्रामस्थ व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक