जिल्ह्यातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण करावीत --खासदार सुनिल तटकरे
रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका) :- जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरु असून सुरु असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,असे निर्देश खासदार सुनिल तटकरे यांनी जिल्हा नियोजन भवन हॉल येथे आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी सत्यजित बडे आदि उपस्थित होते. खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, वडखळ-अलिबाग रस्त्याचे काम, बेलकडे मार्गे अलिबाग-रोहा रस्त्याची प्रलंबित असलेली कामे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. त्याचप्रमाणे राजेवाडी ते म्हाप्रळ या नॅशनल हायवेच्या कामामध्ये काही अडी-अडचणी असतील तर त्या सोडवून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे. मुंबई-गोवा हायवेवरील इंदापूर व माणगाव येथील बायपासची कामेपण सुरु करावीत. नातेखिंड ते रायगड हा रस्ता जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून तेथील कामे...