अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:- महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाव जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.22 ते 26 मार्च या कालावधीत जिल्हा कृषि महोत्सव व महिला स्वयंसहाय्यता गटांचा शेतमाल विक्री मेळावा खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथे आयेाजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम ना.अनंत गिते, राज्याचे कृषि, फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चोतमोल, लोकसभा सदस्य खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, आमदार सुनिल तटकरे, आमदार अनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश ल...