निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
रायगड अलिबाग दि.23, (जि.मा.का.) –विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीच्या मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे. 138 मतमोजणी पर्यवेक्षक, 141 मतमोजणी सहाय्यक, 144 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. 188- पनवेल के . ई . एस . इंदूबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम विद्यालय , पनवेल येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 24 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे. 27 मतमोजणी पर्यवेक्षक, 27 मतमोजणी सहाय्यक, 27 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 189- कर्जत श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय , किरवली कर्जत येथे मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी येथे टेबलची संख्या 14 आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या 24 आहे. 18 मतमोजणी पर्यवेक्षक, 21 मतमोजणी सहाय्यक, 20 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 190 - उरण...