जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय १६ व १७ ला सुरु राहणार
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रवेशासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचे कामकाज येत्या शनिवार दि.16 व रविवार दि.17 रोजी शासकीय सुटी असली तरी सुरु राहणार आहे. या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगडचे सदस्य तथा उपायुक्त सामाजिक न्याय विभाग विशाल नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार, 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी (शास्त्र) या वर्गात शिक्षण घेत असलेल्या व जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी ज्या अर्जदारांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी या समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शनिवार दि.16 जून व रविवार दि.17 जून रोजी शासकीय सुट्टीच्यादिवशी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.तरी ज्यांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा अर्जदारांनी या समितीच्या कार्यालयाकडे आपणाकडे उपलब्ध जातनोंदविषयक कागदपत्रांच्या मूळ व सत...