‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानामध्ये योजनांचा लाभ घ्यावा -- जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे
रायगड (जिमाका) दि. 25:- दिव्यांग कल्याण विभाग ‘ दिव्यांगांच्या दारी ’ अभियानानिमित्त मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय , अशेाक बाग , जुना पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास दिव्यांग अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून दिव्यांगासाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशान्वये दिव्यांगांच्या दारी हे अभियान राज्यातील सर्व महसूल विभागातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात अभियानानिमित्त मेळावा होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड , जिल्हा परिषद रायगड आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ...