रायगड-अलिबाग दि.04- विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघासाठी 80 उमेदवारां ची 98 नामनिर्देशनपत्रे दाखल. आज अखेर जिल्ह्यात 132 उमेदवारांची एकूण 160 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज 09 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1 ) अॅड.अरुण विठ्ठल कुंभार (अपक्ष), 2) श्री. प्रविण सुभाष पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), 3)श्री. उत्तम चंद्रमोहन गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), 4)श्री. हरेश मनोहर केणी (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 5) श्री. हरेश मनोहर केणी (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 6) श्री. बबन कमळू पाटील (अपक्ष), 7)श्री.बबन कमळू पाटील (शिवसेना), 8) श्री. मानवेंद्र यल्लाप्पा वैदू (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी), 9) श्री. गणेश चंद्रकांत कडू (पीझंट्स अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), 10) श्री. गोरक्षनाथ हरी पाटील (अपक्ष) 11) निलम मधुकर कडू (अपक्ष), आज अखेर अशी एकूण 21 नामनिर्देशन पत्र सादर झाली आहेत. ...