प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा --जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी
रायगड-अलिबाग दि.02:- 'स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील
शक्य त्याठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी जेणेकरुन शहरातील प्रत्येक कानाकोपरा
प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पहायला मिळू शकेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय
सुर्यवंशी यांनी केले.
'स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत राबविली जात आहे. नगर परिषद
अलिबागतर्फे जुनीबाजारपेठ व अलिबाग समुद्र किनारी
आयोजित केलेल्या श्रमदान चळवळीच्या
प्रसंगी डॉ.सुर्यवंशी बोलत होते. या उपक्रमांतर्गत
प्लास्टिक वस्तूचा त्याग करुन पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची शपथ जिल्हाधिकारी यांनी घेतली व विद्यार्थी,नागरिक,
अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र
मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, तहसिलदार अलिबाग सचिन शेजाळ,अलिबाग नगर
परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, नागरिक,विद्यार्थी व विविध स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नेहरु युवा केंद्रातर्फे प्लास्टिकमुक्तीवर
आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
००००
Comments
Post a Comment