जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019-2020
अलिबाग दि.21, क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगडद्वारा जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता 1 यांच्या कार्याचे/ योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो, जिल्यातील उत्कृष्ट खेळाडॅ मार्गदर्शक व क्रीडा संघटक/ कार्यकर्ता यांना हा पुरस्कार 26 जानेवारी 2020 रोजी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सन 2019-20 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कारा मध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारा करिता 1 जुलै 2014 ते 30 जून 2019 पर्यतची कामगिरी/ कार्य ग्राह्य धरले जाईल. पुरस्काराचे थोडक्यात निकष खालील प्रमाणे आहेत. 1) गुणवंत खेळाडू :- या पुरस्कारा अंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महि...