राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग (जिमाका) दि.29 :- उद्योग व खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 03 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता बी-6 निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. 11.30 वाजता संत गाडगेबाबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई संचलित श्री समर्थ संत गाडगेबाबा वृध्दाश्रम परहूर पोस्ट कामार्ले ता.अलिबाग चा नामकरण सोहळा व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अलिबागकडे प्रयाण. 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग विभाग, पर्यावरण विभाग, खनिकर्म विभागांची आढावा बैठक. 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून रोहाकडे प्रयाण. साय...