ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 पर्यंत सुट जिल्ह्यातील दिवस जाहीर


अलिबाग,जि.रायगड,दि.29(जिमाका)- केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 नुसार नियम 5 उपनियम -3 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी सहा ते रात्रौ बारा वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाद्वारे  प्राधिकृत केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठीचे पंधरा दिवस जाहीर करण्यात आले आहेत. त्यात नमूद करण्यात आलेले नऊ दिवस रायगड जिल्ह्यात यापूर्वीच उपयोगात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे-शिवजयंती-1दिवस,ईद-ए-मिलाद-1दिवस,डॉ.आंबेडकर जयंती-1दिवस,1 मे-1दिवस, महाराष्ट्र दिन-1दिवस, होळी पोर्णिमा-1दिवस, गणपती उत्सव-4दिवस (दुसरा,पाचवा दिवस,गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी) या सणांकरीता ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम,2017 ची अधिसूचना लागू करण्यात आली होती.
            त्यानंतर उर्वरित सहा दिवस निश्चित करुन त्यांची ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण)सुधारीत नियम,2017 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार नवरात्री उत्सव-2 दिवस (अष्टमी व नवमी),दिवाळी-1दिवस (लक्ष्मीपूजन),ख्रिसमस-1दिवस,31डिसेंबर-1दिवस,दसरा-1दिवस. या सहा दिवसांसाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत सूट दिली आहे, असे  एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत