परसातील कुक्कुट पालन योजनेसाठी श्रीवर्धन, सुधागड-पाली, कर्जत व अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे
रायगड (जिमाका) दि.17 :- रायगड जिल्हयामध्ये परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना 2017-18 पासून राबवण्यात येत असून श्रीवर्धन , सुधागड-पाली , कर्जत व अलिबाग या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्याप पर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे. चार तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल. या योजने अंतर्गत तपशील- जमीन-2500 चौ . फूट (1000 चौ. फुटाचे 2 शेड) खाद्य , अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या. शासन/लाभार्थी सहभाग- जमीन व खोल्या लाभार्थीच्या स्वत : च्या मालकीच्या असतील, एकूण अंदाजित किंमत- निरंक. तपशील- प्रति 1000 चौ. फुटाचे 2 पक्षी गृहाचे बांधकाम , स्टोअर रूम , पाण्याची...