स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध --- ना योगेश सागर
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे, प्रतिपादन राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश सागर यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे मुख्य ध्वजारोहण त्यांचे हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी अलिबाग श्रीम.शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीम.वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उ पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर नगर विकास राज्यमंत्री ना.योगेश सागर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या...