नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी जनतेने शासनास सहकार्य करावे
अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका) : खासगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याच्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपायोजना करण्याच्या उद्देशाने खाजगी डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळ खोकला व ताप, सतत खोकला व रक्तमिश्रीत बेडका, सायंकाळी येणारा ताप, भूक मंदावणे, शरीराचे वजन कमी होणे, यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास अशी व्यक्ती संशयित क्षयरुग्ण समजली जाते. क्षयरोग निदान व उपचार करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, विविध पॅथॉलॉजी रुग्णालये, डॉक्टर्स तसेच क्षयरोगाची...