पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16 2016-2017 तसेच 2017-18 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून शनिवार दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पुरस्काराचे स्वरुप व अर्हता पुढील प्रमाणे- राज्यस्तरीय पुरस्कार:- रु.एक लाख एक रोख, स्मृतीचिन्ह्, शाल व श्रीफळ तसेच महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार,दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे ते पुढील 5 वर्ष पुरस्कारासाठी पात्र राहाणार नाहीत. विभागीय पुरस्कार:- रु. पंचवीस हजार एक रोख स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ तसेच महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलीत मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकाराणापासून अलिप्त अ...