अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न
अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील झिराड येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्री.दिलीप भोईर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मिनल दळवी तसेच झिराड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष ग्रामसभेच्या व मतदार नोंदणी शिबिराच्या निमित्ताने मतदार यादीचे वाचन, नव मतदार नोंदणी, आधीच्या मतदारांच्या यादीची तपासणी आदी महत्वाची कामे करण्यात आली. दि.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण असलेल्या भारतीय नागरिकास मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होईल. मात्र मतदार यादीत नाव असेल तरच आपण मतदान करू शकतो, संविधानाने दिलेल्या या मौलिक अधिकाराचा वापर करण्याची संधी मतदानाच्या वेळी कोणत्याही पात्र मतदाराने गमावू नये, या...