ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत महापंचायतराज अभियान संपन्न

अलिबाग,दि.24 (जिमाका):- ग्रामपंचायत साळवे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पंचायत समिती, रायगड व जिल्हा परिषद यांच्यामार्फत महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा साळवे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या, साळवे आदिवासी वाडी, पानोसे, पानोसे आदिवासी वाडी, पानोसे कोंड इत्यादी ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.वाय. प्रभे, सरपंच मंगल कोळी, उपसरपंच तटगुरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी श्री.गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री.काप व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवलीचे कर्मचारी वृंद, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते. गटविकास अधिकारी श्री.प्रभे आरोग्य, शिक्षण उपजीविका यावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कागदपत्रे व शासकीय लाभ मिळण्याकरिता धडपड करून आपण रोजगार हमी व पायाभूत सुविधा परिपूर्ण करून स्वयंपूर्ण व्हावे. महिलांनी हिमोग्लोबिनवर लक्ष द्यावे व आवश्यक तो पूरक आहार खाऊन सुदृढ राहावे. जलअमृत योजनेंतर्गत तलावामधून गाळ काढून घ्यावा. तसेच आपले कोकण सदैव हरित सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने निसर्ग जपावा व ...