सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश
अलिबाग,दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, गोंधळपाडा, अलिबाग येथे कार्यरत आहे. येथे इयत्ता 8वी पासून गरीब, हुशार, होतकरू मागासवर्गीय अनुसूचित जाती- 80% अनुसूचित जमाती – 3%, विमुक्त जाती भटक्या जमाती – 5%, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनी – 5%, विशेष मागास प्रवर्ग - 2%, अनाथ- 2%, अपंग- 3% यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाश्ता (दररोज पोहे /शिरा / उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतूमानानुसार एक फळ व दूध) तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात चपाती, भाजी / उसळ, लोणचे, पापड इत्यादीसह आठवड्यातून दोन वेळा मांसाहार देण्यात येते. अभ्यासासाठी लागणारे वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.600 निर्वाहभत्ता दिला जातो. तसेच शालेय व गणवेश पात्र महा. विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भ...