Posts

Showing posts from August 10, 2025

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण

    रायगड , दि. 13  (जिमाका):- भारता च्या 79   व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  शुक्र वार ,   दि. 15 ऑगस्ट   202 5  रोजी  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 0 5 वा.संपन्न होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी होणार असल्याने सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 वाजण्याच्यापूर्वी किंवा 9.35 वाजल्याच्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.              तरी नागरिकांनी ,   प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,   असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

“होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” पदासाठी रोजगाराची सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींनी अर्ज करावेत

           रायगड,(जिमाका)दि.12:-   शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्त्राईल देशात  “ होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स ”  या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात सुमारे 5000 युवक-युवतींना संधी मिळणार आहे. याकरिता जिल्ह्यातील युवक-युवतींनी अधिक माहिती व नोंदणीसाठी  https:// maharashtrainternational.com  या अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावेत असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे :- “ होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स ”  सेवांसाठी निपुण/पारंगत,भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (including OJT). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय...

राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी नाव नोंदणी करावी

  रायगड,(जिमाका)दि.12:-   जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणाकरीता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धाही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. जागतिक  कौशल्य स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील  23 वर्षाखालील पात्र  उमेदवारांनी  https://www.skillindiadigital. gov.in ,या लिंकवर भेट देवून दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. त्यानुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करू...